Jaimaharashtra news

पाकिस्तानी पत्रकारानेच घातले पाकच्या परराष्ट्र मंत्र्याचे दात घशात!

भारताच्या Air Strike नंतर पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानवर विरेधकांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवाय पाकिस्तानी मीडियानेही इम्रान खान आणि सैन्याला घेरलंय. पाकिस्तानमध्ये हलाखीची परिस्थिती असल्याची पोलखोल पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी केलीय. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला.

आणि परराष्ट्रमंत्र्यांची झाली बोलती बंद

पाकिस्तानच्या विमानांनी भारताची विमानं पळवून लावली, असा दावा पाकिस्तान सरकारने केला.

पण पाकिस्तानी मीडियाने त्यांच्याच सरकारची बोलती बंद केली.

भारताच्या विमानांना साधा धक्काही लागला नाही, मग आपण काय उत्तर दिलं?  त्यांचे विमान पाडणं शक्य नव्हतं का?” असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर कुरेशी म्हटले की, “पाकिस्तानच्या सैन्याच्या सामर्थ्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करू नका. तुम्ही पाकिस्तानी आहात आणि तुमचा आदर करतो.आम्ही भारताला उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आणि उत्तरही देऊ.”

पाकिस्तानी पत्रकार यावरच थांबले नाही.

एकाने विचारलं की, “पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एवढा उशीर का लागला? भारतीय सैनिक थेट सीमेत घुसले होते.

यावर कुरेशी म्हणाले की, “पाकिस्तानची वायूसेना पूर्णपणे तयार होती. आपण तयार नसतो तर त्यांची विमानं परत कशी पाठवली असती. आपण भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर दिलंय.”

पण या प्रश्नांनी परराष्ट्रमंत्र्यांना भंडावून सोडलं. त्यामुळे भारतीय वायूदलाने पाकिस्तान सरकारची अब्रू वेशीवर टांगल्यावर त्यांच्याच मीडियाने अडचणीत आणणारे प्रश्न विचारून त्यांचे दात घशात घातले आहेत.

Exit mobile version