Mon. May 10th, 2021

पाकिस्तानकडून मसूद अजहरला पाठिशी घालणं सुरुचं

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला.यामध्ये सीआरपीएफचे ४१ जवान शहीद झाले.

या हल्ल्यात अजहर मसूदच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा हात असल्याचं स्पष्ट झालं.

त्यामुळं भारतानं मसूदच्या मुसक्या आवळण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवणं सुरू केलं आहे.

मसूदला संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक दहशतवादी घोषित करावं यासाठीही भारत प्रयत्न करत आहे.

परंतु पाकिस्तान मसूदला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहे.

पाकिस्तानचं नेमक म्हणणं काय?

भारताची आक्रमक रणनीतीमुळं जगाच्या व्यासपीठावर पाकिस्तान घेरलं गेलं आहे.
दहशतवादी अजहर मसूदवर कारवाई करण्याच्या मागणीनंतर पाकनं त्याच्या आजाराचं कारण पुढं केलं आहे.
‘अजहर मसूद पाकिस्तानात असला तरी तो खूप आजारी आहे. तो घराबाहेर पडू शकत नाही अशी त्याची अवस्था आहे, असं पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं आहे.
‘भारताकडं मसूदविरोधात काही पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत. असं ही कुरेशी म्हणाले आहेत.
पाकिस्तानी जनता आणि न्यायव्यवस्थेला याची खात्री पटायला हवी. त्यानंतर पुढील कारवाई करता येईल,’ असं कुरेशी यांनी म्हटलं आहे.पाकिस्तानने मसूदच्या आजारपणाचं कारण दिल्याने पाकिस्तान मसूद अजहरला पाठीशी घालत असल्याचं स्पष्ट होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *