Wed. Oct 5th, 2022

पाकिस्तानची दहशतवाद्यांविरोधात कारवाई; 100 दहशतवादी अटकेत

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने जैशच्या तळांना उद्धवस्त केले. पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. तसेच पाकिस्तानने दहशतवादी संघटन्यांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी अनेक देशांनी केली. पाकिस्तानवर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास इतर देशांनी दबाव घातल्यामुळे पाकिस्तानने कारवाई करण्यास सुरुवात केली.

पाकिस्तानची दहशतवाद्यांविरोधात कारवाई –

पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

तसेच कारवाईची तीव्रताही वाढवली आहे.

पाकिस्तानी सरकारने १८२ मदरसे नियंत्रणात घेतले असल्याची घोषणा केली आहे.

तसेच पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी असलेल्या १०० दहशतवाद्यांना अटक केली.

१२१ समाजकंटकांना प्रतिबंधित कारवाई म्हणून तुरुगांत टाकल्याचे पाकिस्तानच्या मंत्रलयाने सांगितले.

ही कारवाई योग्य पद्धतीने करत असल्याचे पाकिस्तानच्या मंत्रालयाने सांगितले आहे.

जैश-ए-मोहम्मद सारख्या अनेक संघटना असे मदरसे चालवतात.

तसेच या मदरसेद्वारे दहशतवादीचे प्रशिक्षण या मुलांना दिले जाते.

दहशतवादी संघटनांचे देशात ३०० मदरसे चालवत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.