Sat. Nov 27th, 2021

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये बॉम्बस्फोट; 3 पोलिसांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लाहोरमधील सूफी दर्ग्याजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या बॉम्बस्फोटात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते आहे. दाता दरबार दर्ग्याच्या महिलांसाठी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला.

नेमकं काय घडलं ?

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 11 व्या शतकातील दाता दरबार दर्ग्याजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला आहे.

या बॉम्बस्फोटात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या बॉम्बस्फोटात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते आहे.

2010 साली सुद्धा बॉम्बस्फोट करण्यात आला असून 40 लोकांचा मृत्यू झाला होता.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *