पाकिस्तानला चीनने केले कोरोना प्रतिबंधक लसीचे दान

या सोमवारी चीनने पाकिस्तानला पाच लाख कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा सुपूर्द केला असून चीनने पाकिस्तानला या लसी दानमध्ये दिल्या आहेत. शिवाय पाकिस्तान अनेकवेळा चीनकडून मदत मागत असतो. पाकिस्तान अनेक
वस्तूसाठी चीनवर अवलंबून आहे. या आठवडयात पाकिस्तानात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शिवाय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आरोग्य मंत्री यासमीन राशिद यांनी नागरिकांना स्वत:च्या जबाबदारीवर लस टोचून घ्या, असं सांगितलं आहे. “स्वत:च्या जबाबदारीवर लस टोचून घ्या, त्याचे साइड इफेक्टही आहेत.
काही देशांमध्ये लस घेतल्यानंतर मृत्यूही झाले आहेत” असं यासमीन राशिद यांनी स्पष्ट केलं आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, पाकिस्तानात आतापर्यंत पाच लाख ४६ हजार ४२८ जणांना करोनाची लागण झाली असून, ११, ६८३ जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. चीनचे पाकिस्तानातील राजदूत नाँग राँग यांनी रावळपिंडीच्या नूर खान एअर बेसवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याकडे औपचारिकपणे या लसींचा साठा सुपूर्द केल्या. शिवाय लवकरच पाकिस्तानमध्ये कोरोना प्रतिबंधक लसी वितरण होणार आहे.