पाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर
वृत्तसंस्था, पाकिस्तान
पाकिस्तानच्या घुसखोरीला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सीमेकडील पाकिस्तानच्या चौक्या भारतीय लष्करानं उद्धवस्त केल्या.
पाकिस्तानच्या या लष्करी चौक्या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करतात. त्यामुळे दहशतवादविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त करण्यात आल्या. घुसखोरीला मदत केली, तर यापुढेही अशीच कारवाई केली जाईल असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला.