कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळणार, पाकिस्तानचा निर्णय

पाकिस्तानात तुरुंगात असणारे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळणार आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली.

यामध्ये कुलभूषण जाधव जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा विचार करावा तसेच त्याला भारतीय दुतावासाची मदत देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानने हा निर्णय दिला आहे.

पाकिस्तानचा निर्णय

3 मार्च 2016 रोजी कुलभुषण जाधवला पाकिस्ताननं अटक केली होती. ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

भारताकडून या निर्णयाविरोधात 8 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती.

यावर हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.

तीन वर्षांपासून कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती. यामागणीचाही विचार करावा असं सांगण्यात आलं होतं.

कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत (कॉन्स्युलर एक्सिस) देण्यात यावा असं ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सांगण्यात आलं होतं.

आयसीजेच्या निर्णयानंतर पाकिस्तानने त्यांना भारतीय दुतावासाची मदत देण्यात यावे असे आदेश दिले आहेत.

 

 

Exit mobile version