Sun. Jun 20th, 2021

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे हा ऐतिहासीक निर्णय मानला जात आहे. राज्यसभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून उद्या लोकसभेत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे हा ऐतिहासीक निर्णय मानला जात आहे. राज्यसभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून उद्या लोकसभेत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. हे कलम रद्द झाल्यामुळे पाकिस्तानमध्येही हालचाली सुरू आहेत.

पाकिस्तानमध्ये काय हालचाली?

अमित शाह यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडला आणि सर्वत्रच हालचालींना वेग आला आहे. मोदी सरकारने हा ऐतिहासीक निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीला इम्रान खान, लष्करप्रमुख उपस्थीत होते. याठिकाणी370 हटवण्याचा निषेध करण्यात आला आहे.

पाकिस्तानी संसदेचं संयुक्त अधिवेशन उद्या बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात भारताच्या निर्णयावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांंनी तुर्कस्थान, मलेशियासह अनेक देशांच्या प्रमुखांना फोन केले असल्याचेही सांगण्यात येत आहे. अरब राष्ट्र आणि इतर मुस्लीम राष्ट्रांचा पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *