Jaimaharashtra news

कुलभूषण जाधव प्रकरणी अखेर पाकिस्तान झुकला!

कुलभूषण जाधव प्रकरणात अखेर पाकिस्तानला झुकावंच लागलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०२० मध्ये काढलेल्या अध्यादेशाला मान्यता मिळाली असून यानंतर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मिळाली आहे.

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य कातरण्यात आला असून पाकिस्तानमध्ये कैद असलेले कुलभूषण जाधव यांना आव्हान देण्याचा अधिकार दिला आहे. कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानच्या कारागृहात आहेत. पाकिस्तानच्या एजन्सीने कुलभूषण जाधव यांना इरान म्हणून पकडलं होतं.

कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी असल्याच्या मतावर भारत सरकार ठाम आहे. इरानमध्ये कुलभूषण जाधव एका व्यवसायानिमित्त गेले होते. तेथेच त्यांचं अपहरण करून त्यांना पाकिस्तानच्या लष्कराकडे स्वाधीन करण्यात आलं.

कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर असून त्यांनी अनेक पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याची कारवाई केली, असा आरोप पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर केला आहे. यामुळे पाकिस्तानच्या एका न्यायालयाने कुलभूषण यांना मृत्यूदंड सुनावला. यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर भारताच्या बाजूने निर्णय झाला.

Exit mobile version