Wed. Jun 23rd, 2021

पाकच्या उलट्या बोंबा; एअर स्ट्राईकमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान झाल्याचा आरोप

भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारताला सोपवले असले तरीही पाकिस्तानच्या कुरापती कमी झाल्या नाहीत.

संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तान भारताविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये आमच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान झाले असल्याचा आरोप पाकिस्ताने केला आहे.

काय म्हणाले इम्रान खान ?

भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केली होती.

या एअर स्ट्राईकमध्ये आमच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान झाले.

एअर स्ट्राईक झालेल्या ठिकाणी पाईन वृक्ष होते.

हल्ला झाल्यामुळे हे पाईन वृक्ष उध्दवस्त झाले असं इमरान खान यांनी म्हटलं आहे.

एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतावादी आणि जैश-ए-महोम्मदचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केल्याचा दावा भारताने केला.

मात्र या ठिकाणी कोणतेही कॅम्प नव्हते आणि या हल्ल्यात कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *