Mon. Jun 1st, 2020

“शांततेची एक संधी द्यावी” – इम्रान खान

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यामुळे शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच भारतीय जवानांना या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र दिलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो या भीतीपोटी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. जर भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी काही पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू असेही पाकच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

शांततेची एक संधी द्यावी –

राज्यस्थान येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुलवामा कटाच्या सूत्रधारांना सोडणार नाही.

पुलवामा हल्ल्याचा बदला नक्की घेतला जाईल.

हा बदलेला भारत असून दहशतवादामुळे ज्या वेदना होतात त्या अजिबात सहन करणार नाही.

दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाचे एकमत आहे.

दहशतवाद्यांचा कसा खात्मा करायचा हे आम्हालाही ठाऊक आहे, असे मोदी म्हणाले.

या सभेनंतर पाकच्या पंतप्रधानांनी भीतीपोटी आम्हाला शांततेची एक संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.

निवडून आल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता.

तेव्हा मी पठाणचा मुलगा आहे. शब्द पाळणार असे इम्रान खान म्हणाले आहे.

आता बघू किती शब्द पाळतात असे मादी सभेदरम्यान म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *