Tue. Aug 3rd, 2021

PulawamaTerrorAttack : पाकिस्तानच्या उलट्या बोंबा!

1972 नंतर 1999 पर्यंत आम्ही सर्व शांततेत काम करत होतो. त्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसखोरी केली. भारतानं अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानात दहशतवाद पसरवला, अशा उलट्या बोंबा पाकिस्तानी लष्कराने आपल्या पत्रकार परिषदेत मारल्या.

लष्कराने चौकशी पूर्ण केली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं यावेळी उत्तर द्यायला थोडा वेळ घेतला, असं यावेळी पाकिस्तानचे मेजर जनरल असिफ गफूर यांनी सुरुवातीला म्हणत आपल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी भारतालाच दहशतवादी ठरवायचा प्रयत्न सुरू केला.

काय म्हणाला असिफ गफूर?

पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाही.
भारतीय सैन्याच्या सुरक्षेचे अनेक स्तर आहेत.
या सुरक्षा कवचातून कुणीही पाकिस्तानी व्यक्ती कशी काय तिथपर्यंत पोहोचू शकते?
पुलवामा हल्ला हा LOC पासून खूप अंतरावर झाला.
हल्ल्यात स्थानिक काश्मिरी तरुणांचा सहभाग होता.
हल्ल्यात वापरली गेलेली गाडी ही काश्मिरची होती.
हल्लेखोर आदिलचा व्हिडिओ खोटा आहे.
तो भारतानंच तयार केलेला आहे

पाकिस्तान बदलतोय

आम्हाला इथवर पोहोचायला खूप अडचणी आल्या आहेत.

आता आम्हाला स्थैर्य हवंय. आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय.

आम्ही विकासाच्या मार्गावर चालतोय.

आमच्याकडून चुका झाल्यात, पण त्यातून आम्ही खुप शिकलो.

आम्ही या हल्ल्यानंतर एका जबाबदार देशासारखं उत्तर दिलंय.

आमच्या पंतप्रधानांनी चर्चेचं आवाहन केलंय.

आम्हाला पुरावे द्या, आम्ही कारवाई करु असंही आमच्या पंतप्रधानांनी सांगितलंय.

आम्ही आता दहशतवादाला थारा देत नाही.

आम्ही युद्धाची तयारी करत नाही.

युद्ध आणि बदल्याची भाषा भारत करतोय.

भारतात काहीही झालं तरी पाकिस्तानचं नाव घेतलं जातं.

या सगळ्याचा परिणाम आमच्या तरुणांवर होतो.

आमच्या दहशतवादाच्या लढाईत यश येत होतं.

तेव्हाही भारतानं दहशतवादाला खतपाणी घातलं.

कुलभूषण जाधव हे भारतीय दहशतवादाचं जिवंत उदाहरण आहे.

जेव्हा कधी पाकिस्तान दहशतवाद संपवण्याच्या जवळ असतं आणि भारतात काही महत्वाची घटना होणार असेल तेव्हा पुलवामासारखी मोठी घटना घडते.

फेब्रूवारी-मार्च मध्ये पाकिस्तानात आठ महत्वाच्या घटना घडणार होत्या.

या महत्वाच्या घटनांबरोबरच भारतात निवडणुकीसारखी महत्वाची गोष्ट घडणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर भारतानं पुलवामाचा हल्ला घडवून आणला.

सौदी राजपुत्राच्या पाकिस्तान भेटीच्या आधीच हा हल्ला जाणूनबुजून घडवून आणला गेला.

जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा बदलतेय.

अनेक देश पाकिस्तानशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतायेत.

1962 मध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी आम्ही नविन देश होतो, आमच्याकडे सोयीसुविधा नव्हत्या.

1972 नंतर 1999 पर्यंत आम्ही सर्व शांततेत काम करत होतो.

त्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसखोरी केली.

‘पाकिस्तानशी पंगा घेऊ नका’

आम्ही युद्धाला तयार आहोत

भारत युद्धाची भाषा करतोय. आम्ही आम्ही सुरुवात करणार नाही, पण उत्तर द्यायला मात्र मागे राहणार नाही.

भारतानं युद्ध केलं, तरी ते आम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. उलट आम्हीच आता त्यांना आश्चर्याचा धक्का देऊ.
आम्ही तयार आहोत.

पाकिस्तानशी पंगा घेऊ नका, अशी पाकिस्तानने भारताला धमकी दिली आहे.

भारतीय मीडियावर पाकिस्तानचे आरोप

भारतीय माध्यमं वॉर जर्नलिझम करत आहेत, असं म्हणत भारतीय प्रसारमाध्यमांना पाकिस्तानने दोष दिला आहे.
आम्हाला शांतता हवी आहे.
आणि आमच्या शांततेच्या मार्गात तुम्ही अडथळे आणू नका.
आम्हाला विकासाच्या मार्गानं जायचंय.
आम्हाला आमच्या जनतेची सुरक्षा हवीये.
जर तुम्हाला शांतता हवी असेल तर आणखी कुलभूषण जाधव पाकिस्तानात पाठवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *