Mon. Jan 17th, 2022

#WelcomeBackAbhinandan : अखेर विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका

भारतीय वैमानिक अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्यांची सुटका  कऱण्याचा पाकिस्तानने  आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे.

इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं संसदेत बोलताना सांगितलं आहे.

अभिनंदन यांना  तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती.

कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

लवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला.

भारताने या हल्ल्याचं प्रत्युत्तर देत एअर स्ट्राइक केली. यानंतर दुसऱ्यात दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने विमान घुसवत भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.

पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले होते, मात्र त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं.

यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरु झाले होते.

काय घडलं पडद्यामागे? 

  • बुधवारी संध्याकाळी भारतीय परराष्ट्र सचिवाने पाकच्या उचायुक्तांना पाचारण केलं.
  • विंग कमांडर अभिनंदन यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी भारताने केली.
  • अमेरिकेसह सौदी अरेबीयानं मध्यस्थी करत दोन्ही राष्ट्रांशी बोलणी सुरु केली.
  • पाकचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अभिनंदन यांच्या सुटकेचे संकेत दिले.
  • मात्र अभिनंदन यांच्या सुटकेसाठी बार्गेनिंग करणार नाही असं भारतानं स्पष्ट केलं.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरचं एक चांगली बातमी येणार अशी माहिती दिली.
  • संसदेच्या विशेष सत्रात बोलतांना इम्रान खान यांनी सुटका करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *