Sun. Sep 19th, 2021

#PulwamaTerrorAttack : पुलवामा हल्ल्यांशी आमचा संबंध नाही: पाकचे स्पष्टीकरण

पुलवामा जिल्ह्य़ात झालेल्या  भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले.

गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

पाकिस्ताननेही या हल्ल्याचा निषेध करताना हल्ल्याशी संबंधित आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

काय म्हटलं निवेदनात ?

गुरुवारी रात्री पाकिस्तान सरकारने निवेदनाद्वारे पुलवामा दहशतवादी हल्ल्यांचा निषेध नोंदवला आहे.

पुलवामा हल्ला हा गंभीर चिंतेचा विषय आहे. अस पाकिस्तानने निवेदनात म्हटलं आहे.

भारतीय माध्यमे आणि भारत सरकार कोणत्याही तपासाशिवाय या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडत आसल्याचे पाकिस्तानने म्हटलं आहे.

कोणताही  हल्ला झाला की त्याचा संबध थेट आमच्याशी जोडला जातो पण आमचा या हल्ल्याशी काहीच संबध  नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

भारतातच नाही तर जगात कोठेही दहशतवादी हल्ला किंवा हिंसा  झाल्यास पाकिस्तान त्यांचा निषेधच करतो असे या निवेदनाद्वारे पाकिस्तानने म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *