Wed. Dec 1st, 2021

पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी ‘शाहरुख’ला पंजाबमधून अटक!

भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमधल्या फिरोजपुरमध्ये BSF ने  एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेचे फोटो काढत असताना त्याला ताब्यात घेतल. एकीकडे पाकिस्तान भारतीय विंग कमांडर अभिनंदन याची सुटका करून आपण शांततेसाठी पुढाकर घेत असल्याच दाखवत आहे तर दुसरीकडे भारताविरोधात कट रचत आहे.

पाकिस्तानी हेर अटकेत

पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये सुरक्षादलाने पाकिस्तानी हेराला अटक केली आहे.

मोहम्मद शाहरुख असं या हेराचं नाव आहे.

हा हेर उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमधली रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सुरक्षादलाने त्याची झडती केल्यानंतर त्याच्याकडून पाकिस्तानचं सीमकार्ड असलेला मोबाईल आणि कॅमेरा जप्त करण्यात आला आहे.

शाहरूखचा नंबर  पाकिस्तानच्या 8  व्हॉट्सअप ग्रूपमध्ये अॅड केलेला आहे.

त्याच्या मोबाईलमधून पाकिस्तानशी संपर्कात असलेले 6 मोबाईल क्रमांकही मिळाले आहेत.

शाहरूख पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

सुरक्षा दलाकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *