पाकिस्तानने मानले भारताचे आभार

कोरोनाशी लढा देताना परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न हा जगभरात कौतुकाचा विषय बनला आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी अत्यंत गंभीर परिस्थितीत भारतीय विमान कंपनीने केलेली कामगिरी पाहून पाकिस्ताननेदेखील भारताचं कौतुक केलं आहे.
अत्यंत विपरीत परिस्थितीत तुम्ही जे सहाय्य पुरवत आहात, आम्हाला त्याचा अभिमान आहे, असं पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (ATC) म्हटलं आहे. लॉकडाऊनमुळे युरोपातले जे नागरिक अडकले होते, त्यांना एअर इंडियाच्या विमानांनी फ्रँकफर्टला पोहोचवण्यात आलं. पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून ही विमान गेली. तेव्हा पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने भारतीयांचं कौतुक केलं आहे. इतक्या कठीण परिस्थितीत भारतीय विमानं उड्डाण करत आहेत, याची पाकिस्तानने प्रशंसा केली.
एअर इंडियाचे वरिष्ठ कॅप्टन यांनीदेखील पाकिस्तानने तारीफ केल्याचं कबूल केलं आहे. ‘पाकिस्तानच्या हद्दीत एअर इंडियाचं विमान गेल्यावर त्यांच्याकडून अस्सलाम वालेकुम असं म्हणत आमचं स्वागत केलं.’