Sun. Sep 19th, 2021

#CWC2019 : सामना जिंकूनही पाकिस्तानच्या सेमी-फायनलच्या स्वप्नाला सुरुंगच!

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशला नमवलं. मात्र तरीही पाकिस्तानचं सेमी-फायनलमधील आव्हान संपुष्टात आलंय. सामन्यापूर्वी पाकिस्तानने 500 धावा करून बांग्लादेशला 50 धावांमध्येच गुंडाळण्याच्या फउशारक्या मारल्या होत्या.

का गाठू शकलं नाही पाकिस्तान सेमी-फायनल?

सामन्यात आपलं आव्हान टिकवण्यासाठी पाकिस्तानला किमान 308 धावा करणं गरजेचं होतं.

आधी बॅटिंग घेत पाकिस्तानने 315 धावांची मजलदेखील मारली.

पण सेमी फायनलला जाण्यासाठी पाकिस्तानला बांग्लादेशला 7 धावांच्या आत बाद करायचं होतं.

मात्र हे शक्य झालं नाही.

मोहम्मद हाफिजची पहिली ओव्हर मेडन गेली. मात्र मोहम्मद आमिरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बांग्लादेशच्या ओपनर्सनी 7 धावा करत पाकिस्तानच्या सेमी-फायनलला पोहोचण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला.

बांगलादेशच्या शाकीब अल हसनने हाफ सेन्च्युरी केली.

मात्र त्याची विकेट गेल्यावर इतर बॅट्समन फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत.

पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने भेदक गोलंदाजी करत बांग्लादेशाचे 6 बॅट्समन पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

बांग्लादेशाचा डाव 221 धावांवर संपला.

पाकिस्तानने हा सामना जिंकला खरा, पण सेमी-फायनल गाठायचं आव्हान मात्र त्यांना पुरं करता आलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *