Sun. May 9th, 2021

शाहरूख खानच्या वेबसिरीजची देशभक्ती, ठरतेय पाकिस्तानसाठी डोकेदुखी!

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हटला जाणारा शाहरूख खान आता वेबसिरीजच्या निर्मितीत उतरला आहे. त्याने प्रोड्युस केलेल्या ‘बॉर्ड ऑफ ब्लड’ या  वेबसीरिजची सध्या चर्चा सुरू आहे. प्रेमासोबतच देशप्रेम, हेरगिरी आणि कर्तव्य यांची गुंफण असलेली एक रहस्यमय कथा असं या वेबसिरिजचं वर्णन करत शहारुखने आपल्या ट्विटर आकांऊटवर आपल्या वेबसिरिजचा ट्रेलर शेअर केला. मात्र हा ट्रेलर पाहून पाकिस्तानी चाहते मात्र अस्वस्थ झाले आहेत.


पाकिस्तानी चाहत्यांमध्ये शाहरूख खानची मोठी क्रेझ आहे. त्यातून शाहरूख खानची पूर्वज पाकिस्तानातल्या पेशावरचे असल्यामुळे ते शाहरूखला पाकिस्तानीच मानतात. अनेकदा शाहरूखच्या पाकिस्तानशी असणाऱ्या नात्यामुळे भारतात त्याच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण गेल्या काही काळापासून परिस्थिती बदलली आहे. भारतात देशभक्तीपर सिनेमांची लाट उसळली आहे. त्याला प्रतिसादही भरभरून मिळतोय. याउलट शाहरूखच्या सिनेमांना गेल्या काही वर्षांत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अशा परिस्थितीत शाहरूखची निर्मिती असलेल्या वेबसिरिजमध्ये भारताच्या बाजूने केलेलं चित्रण पाहून पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यालाही धक्का बसलाय.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्रेलर पाहून शारुखानला ‘बॉलिवूड सिंड्रोम’ झाल्याचा आरोप केलाय. आपल्या Tweet मध्ये त्याने तसं म्हटलंय. ‘सत्य जाणून घ्यायचं असेल तर RAW च एजंट कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि 27 फेब्रुवारी 2019 ची स्थिती पाहा.’ ट्विटमध्ये म्हटलंय. शाहरूखने भारतावरचं प्रेम दाखवताना बलुचिस्तानसारखा पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठरणारा बलुचिस्तानचा विषय निवडल्यामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखू लागलंय. ‘तू शांततेसाठी आणि मानवतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसत्न करायला हवे. जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला हवा. तसंच नाझीवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिदुंत्वाविरूद्ध बोलायला हवं’, असं गफूरने ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटवरून भारतीय नेटिझन्सनी गफूरला ट्रोल केलंय.

काय आहे ‘बार्ड ऑफ ब्लड’?

येत्या 27 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.

ऋभु दासगुप्तानं ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे.

बिलाल सिद्दिकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर ही सिरीज आधारलेली आहे.

यामध्ये तीन भारतीय गुप्तहेरांची कथा आहे.

हे गुप्तहेर एका रेस्क्यू मोहिमेकरता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जातात.

हे रेस्क्यू ऑपरेशन ‘सुसाइड मिशन’ असल्याचं टिजरमध्ये सांगण्यात आलंय.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *