पाकिस्तानमध्ये मॉडेलची गळा चिरून हत्या

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan) महिलांविरूद्ध होणारे अपराध अद्यापही थांबलेलं नाही आहे. दरम्यान लाहौरमध्ये एका मॉडेलची गळा चिरून हत्या झाल्यानं या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच ही हत्या अज्ञातांनी केली असून ही मॉडेल
29 वर्षाची होती. मॉडेल नायब नदीमचा (Nayab Nadeem)मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार नायब नदीमच्या हत्येची तक्रार तिच्या भावाने पोलिसात केली आहे. नायबच्या भावाने केलेल्या तक्रारीच्या आधारावर सध्या पोलिसांची चौकशी सुरू आहे.
डिफेन्स बी पोलीस स्टेशनचे एसएचओ नैयर निसार म्हणाले की, बहुधा या मॉडेलची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी. मात्र पोस्टमार्टमनंतर या घटनेविषयी अनेक खुलासे होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मॉडेलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार. 9 जुलै रोजी मध्यरात्री मॉडेलचा भाऊ तिच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याला नायब मृत्यूदेह जमीनीवर पडलेला आढळला.
त्यानंतर मॉडेलच्या भावाने या घटनेबद्दल कल्पना ही पोलिसांना दिली. मॉडेलच्या मानेवर घाव असल्याची माहिती ही तिच्या भावाने दिली आहे शिवाय घरातील बाथरूमच्या काचा तुटलेल्या होत्या असं देखील त्याने सांगितलं आहे. नायब घरी एकटीचं राहात होती. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.