Fri. Aug 6th, 2021

नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन; पाकचे तीन सैनिक ठार

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्यामुळे वारंवार पाकिस्तान नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करताना दिसतात. आज पुन्हा एकदा पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलामध्ये आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले आहे.

नेमकं काय घडलं ?

पाकिस्तानच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असताना सुरक्षा दलामध्ये आणि पाकच्या सैनिकांमध्ये चकमक झाली.

या चकमकीत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना कंठस्नाना घालण्यात सुरक्षा दल यशस्वी ठरली आहे.

रावलकोट सेक्टरजवळ पाकिस्तानच्या तुकडीने LOCवर गोळीबार केला.

या चकमकीत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशी माहिती भारतीय जवानांनी दिली.

तसेच या गोळीबारात सहा घरांचं नुकसान झाली आहेत.

त्यामुळे स्थानिक जखमी झाले आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *