Wed. Aug 10th, 2022

भारतातील १२ शहरांवर बॉम्बहल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट?

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकमध्ये तणावाचे वातावरण आहे. विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करून पाक शांततेचा पुढाकर करत असल्याचे दाखवत असला तरी पाकच्या कुरापती कमी होत नाही आहेत. पाकिस्तान भारतातील तब्बल 12 शहरांत बॉम्बहल्ला आणि तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी  करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

भारतातील १२ शहरांत बॉम्बहल्ला ?

भारत आणि पाकमध्ये असलेले तणावाचे वातावरण हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर निवळण्याची शक्यता होती.

मात्र यातच पाकिस्तान भारतातील तब्बल 12 शहरांत बॉम्बहल्ला आणि तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते.

यावर पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून भारतीय वायु दलाला निशाणा साधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

त्यानंतर भारतात पंतप्रधान मोदी आणि सुरक्षा दलाची बैठक पार पाडली.

या बैठकीत पाकिस्तानमधील कराची या शहरासह इतर 9 ठिकाणं लक्ष्य करण्यात आली.

यासंदर्भात पाकिस्तानला माहिती मिळाल्यावर भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतातील 12 शहरांवर बॉम्बहल्ले आणि तीन क्षेपणास्त्रे डागण्याचा कट पाकिस्तानने रचला असल्याची माहिती मिळाली आहे.

भारताने पाकिस्तानात 1 जरी क्षेपणास्त्र डागले तर आम्ही तीन क्षेपणास्त्रं भारतावर डागू , अशी धमकीच  पाकिस्तानने दिली आहे.

यासंदर्भात भारतीय गुप्तचर संस्थेला माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेला अलर्ट करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.