Thu. Apr 22nd, 2021

मराठी ज्योतिरादित्य सिंदिया राहतात 400 खोल्यांच्या राजमहालात

शिंदे आणि होळकर या सरदारांबद्दल इतिहासात आपण वाचलंच आहे. त्यांपैकीच शिंदे हे ग्वाल्हेर येथे शाही दिमाखात राहतात. शिंदे यांना मध्य प्रदेशात सिंदिया म्हटलं जातं. ज्योतिरादित्य सिंदिया हे मूळचे ज्योतिरादित्य शिंदे आहेत. ते मराठी आहेत.

सिंदिया यांची श्रीमंती

ज्योतिरादित्य हे राजघराण्यातले असल्यामुळे ते राजमहालातच राहतात. त्यांच्या राजमहालाचं नाव ‘जयविलास पॅलेस’ असं आहे. हा महाला 1874 मध्ये बांधण्यात आला होता. त्यावेळी या महालाची किंमत 1 कोटी होती. 40 एकर पसरलेल्या या राजमहलाला 400 खोल्या आहेत. यातील 40 खोल्यांमध्ये म्युझियम बनवण्यात आलंय.

या जयविलास राजवाड्यातील दरबार हॉल 100 फूल लांब, 50 फूट रुंद आणि 41 फूट उंच आहे.

या महालाच्या छताला 3500 किलो वजनाची दोन झुंबरं लावली आहेत.

राजमहालाचा डायनिंग हॉल भव्य असून त्यातील टेबलवर एक चांदीची ट्रेन आहे.

ही ट्रेन टेबलवर फिरत असते आणि आपण आपल्याला हवे ते पदार्थ त्यातून घेऊ शकतो.

महाराष्ट्रातील श्रीगोंद्यात शिंदे यांची 19 एकर तर लिंबण येथे 53 एकर जमीन आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी घोषित केलेली संपत्ती 32 कोटी 64 लाख 18 हजार 412 रुपये होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *