Sun. Feb 28th, 2021

समर कॅम्पला गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड समर कॅम्पसाठी गेलेल्या मुंबईतील 13 वर्षांच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

 

वसईजवळील सजन येथे सजन नेचर ट्रेन रिसॉर्टमध्ये मुंबईच्या विक्रोळीमधून 120 मुलं समर कॅम्पला आली होती. त्यातील मनन गोगारी या मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला.

 

बंधाऱ्यात बुडालेल्या मनन गोगारी या शाळकरी मुलाचा मृतदेह शोधण्याचा स्थानिक गावकरी आणि पोलिसांनी खूप प्रयत्न केला. मात्र, गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास मननचा मृतदेह सापडला.

 

विक्रमगड पोलिसांनी याप्रकरणी रिसॉर्टच्या मॅनेजरसह दोघांवर तर समर कॅम्पमधील दोघां आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *