Tue. Jun 15th, 2021

तीन महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के

पालघरमध्ये शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. हे धक्के डहाणू, तलासरी या भागात बसले आहेत. 3.3.रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली. या परिसरात गेल्या काही दिवसात सतत भूकंप होत आहे. याचा परिणाम पालघरमधील जनजीवनावर देखील होत आहे. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. येथील अनेक स्थानिकांवर भीतीपोटी घरं सोडण्याचीही वेळ आली. या ठिकाणी प्रशासनाकडून भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसंच भूकंपग्रस्त नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

     नोव्हेंबरपासून पालघरमध्ये भूकंपाची मालिका

  • तलासरी तालुक्यात 11 नोव्हेंबर 2018 पासून 10 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
  • 12 डिसेंबर 2018 रोजी पालघरच्या धुंदलवाडी येथे धक्के बसले.
  •  25 आणि 27 जानेवारी 2019 रोजी डोंगरीपाडा आणि तलासरी येथे भूकंप निरीक्षणासाठी तात्पुरतं क्षेत्र कार्यालय स्थापन केलं.
  • 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला.
  • 1 फेब्रुवारीला भूकंपाच्या 6 धक्क्यांनी पालघर हादरलं.
  • हा धक्का रिश्टर स्केलवर 3.3 इतक्या तीव्रतेचा होता.
  • या भूकंपामध्ये 2 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यूही झाला.
  • 8 फेब्रुवारी 2019 रोजी पुन्हा 3.3.रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *