Sun. Jun 20th, 2021

पालघर नगरपरिषदेचा निकाल जाहीर; उज्वला काळे नगराध्यक्षपदी

पालघर नगरपरिषदेच्या २८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्ष लोकांमधून निवडून येत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या उज्वला काळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. महाआघाडीच्या  उज्वला काळे यांनी महायुतीच्या शिवसेना उमेदवार श्वेता पाटील यांना १०६९ मतांनी पराभूत केले आहे.

पालघर नगरपरिषद निवडणूक –

पालघर नगरपरिशदेच्या २८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

शिवसेनेचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत.

मात्र नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे निवडून आल्या आहेत.

यामुळे शिवसेनेचे १४ नगरसेवक निवडून आले तरी नगराध्यक्ष लोक निवडत असल्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

नगरध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून श्वेता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उज्वला काळे, अपक्ष उमेदवार अंजली पाटील उभे होते.

त्यामधील राष्ट्रवादीच्या उज्वला काळे यांना विजयी झाल्या आहेत.

महाआघाडीच्या  उज्वला काळे यांनी महायुतीच्या शिवसेना उमेदवार श्वेता पाटील यांना १०६९ मतांनी पराभूत केले आहे.

पालघर निवडणुकीचा निकाल –

भाजपा – ०७

शिवसेना – १४

अपक्ष – ०५

राष्ट्रवादी – ०२

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *