Wed. Oct 27th, 2021

…तर मुंबईचं पाणी अडवू; शेतकऱ्यांचा इशारा

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

समृद्धी महामार्ग रद्द केला नाही, तर मुंबईचं पाणी अडवू, असा इशारा आता शेतकऱ्यांनी दिला आहे. 

 

समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांसह आजी माजी आमदार आणि खासदार शहापुरात आलेत.

 

शहापुरात त्यांनी रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन केले.  शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवायच सरकारनं समृद्धी मार्गासाठी भूसंपादन सुरू केले.

 

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे.  ठाणे, शहापूर, नाशिक, औरंगाबाद, नगर, अमरावती आणि नागपूर येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

 

शहापूरच्या धऱणातून मुंबईला मिळणारं पाणी अडवू, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *