निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या नॉटी श्वानाचा मृत्यू

मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या नॉटी या श्वानाचा आज मृत्यू झाला. पालघर मधील सफाळे येथील माजी रणजीपट्टू राजेश सुतार यांनी त्याला दत्तक घेतलं होतं.

ब्लॅक लॅबरेडॉर जातीचा असलेला नॉटी हा २०१४ मध्ये सेवा निवृत्त झाला होता. लष्कर-ए-तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता. मंगळवारी अचानक नॉटी आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

नॉटी हा १४ वर्षांचा होता.बाँबे वेटरनरी कॉलेज,लोअर परेल येथील स्पंदन या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नॉटिने शौर्य पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.

Exit mobile version