Thu. Oct 21st, 2021

पालघरच्या सूर्या नदीला पूर

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघरमध्ये सूर्या नदीला पूर आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पालघरमध्ये धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने धामणी धरण क्षेत्रात 86 मिलीमीटर पावसाची नोंद

झाली.

 

त्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला. तर, मनोर-पालघर राज्यमार्गावरील मासवण मधील जूना पूल पाण्याखाली गेला.

 

सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 76.67 टक्के भरले. त्यामुळे या धरणाचे पाचही दरवाजे दीड फुटाने उघडले आहेत.

 

धामणी धरणातून 5100 क्युसेक्स आणि कवडसा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या पालघरमध्ये पावसाने विश्रांती घेतली. मात्र, पाणी ओसरण्यास आणखीन

काही काळ जावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *