कमी पटसंख्या असलेल्या जि. प. शाळा बंद करण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आंदोलन
जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेसनं विरोध केला आहे.
जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसनं दिला.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद कऱण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यात पालघर जिल्हा परिषद शाळेचाही समावेश आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेवरच अवलंबून असतात, मात्र सरकार या शाळांना निधी, शिक्षक देत नाहीत, सोयीसुविधा पुरवत नसल्याचा आरोप काँग्रेसने
केला.