Thu. Mar 21st, 2019

पॅनकार्ड काढण्याची प्रक्रिया झाली सोपी

0Shares

आता पॅनकार्ड हे सर्व आर्थिक व्यवहारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. पण पॅनकार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया अनेकांना किचकट वाटत होती. मात्र आता पॅन कार्डसाठी फार दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण आता अर्ज केल्यानंतर केवळ 4 तासांमध्येच तुम्हाला पॅनकार्ड मिळू शकणार आहे.

सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली आहे. पॅनकार्डसाठी प्राप्तिकर विभागाकडे अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष पॅनकार्ड मिळण्यासाठी किमान 10 ते 15 दिवसांचा अवधी लागतो. पण नव्या प्रणालीमुळे केवळ 4 तासांमध्ये पॅनकार्ड मिळणे शक्य होईल. ”पॅन कार्ड काढणे सोपे व्हावे यासाठी प्राप्तिकर विभाग एक प्रणाली घेऊन येत आहे.

या प्रणालीमुळे वर्षभरानंतर आम्ही केवळ 4 तासात पॅन कार्ड देण्यास सक्षम होऊ,” असे सुशील चंद्रा यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *