अल्पवयीन मुलीवर बलात्कार, त्यावर पंचायतीची संतापजनक शिक्षा!

धुळे जिल्ह्यातील धोंगडेपाडा गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या बाळा सहाने या बलात्कार करणाऱ्याला अखेर पिंपळनेर पेालिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे अत्याचारा नंतर पिढीत अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबाला बहिष्कृत करणाऱ्या जात पंचायती विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोंगडेपाड्यातील अवघ्या 15 वर्षांच्या मुलीवर गावातीलच बाळा सहाने याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला.
झालेल्या अत्याचारानंतरही गावातील जात पंचायतीने पीडितेला कुटुंबासह गावातून बहिष्कृत केलं होतं.
त्याचबरोबर ११ हजार ५१ रुपयांचा दंडही ठोठवला होता.
दरम्यान या प्रकरणी सामाजिक संघटनासह प्रसार माध्यमांनी आवाज उठवला.
अखेर पोलिसांनी जात पंचायतीच्या प्रमुखासह सहाजणा विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पिडितेवर अत्याचार करणारा प्रमुख संशयित आरोपी बाळा सहानेला पोलिसांनी ‘पोक्सो’ कलमा अंतर्गत अटक केली आहे.
न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पीडित मुलीची तक्रार घेण्यास आणि नराधमावर कारवाई टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतेय.