Wed. May 12th, 2021

पंढरपुरात भाजपचे समाधान अवताडे विजयी

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे समाधान अवताडे हे विजयी झाले आहेत. अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा ३, ७१६ मतांनी पराभव केला. पंढरपूर निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडी सरकारविरोधात कौल दिल्यावर पहिली प्रतिक्रिया अवताडे यांनी दिली आहे.

मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत. सातव्या फेरीपासून मात्र अवताडेंनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या विजयानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवरुन अवताडे यांचं अभिनंदन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *