Thu. Jan 20th, 2022

पंढरपूरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची कोयत्यानं वार करून हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवकाची भर चौकात हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांच्यावर कोयत्यानं वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 

 

सोमवारी संध्याकाळी सांगलीतील खरशिंग फाट्याजवळ नामदेव यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. 

 

अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात नामदेव भुईटे यांचा मृत्यू झाला. हा हल्ला का करण्यात आला, हल्ल्यामागे कोण आहे, याचा शोध सध्या सांगली पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *