गावकऱ्यांनी वेशीवरच कोरोनाला रोखलं

पंढरपूर: कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त असताना पंढरपूरमधील चिंचणी हे गाव मात्र कोरोनापासून चार हात लांब आहे. नियमित स्वच्छता,सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर वापर करणाऱ्या गावकऱ्यांनी गेल्या दीड वर्षापासून कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे.कोरोना नियमांच्या त्रिसूत्रीमुळे चिंचणी गावाला कोरोनापासून दूर ठेवता आल्याचं येथील ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.

पंढरपूर तालुक्यातील एक हजार लोकवस्तीचं  चिंचणी हे गाव आहे.येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन सुमारे सात हजाराहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना निसर्गाकडूनच भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वत्र हाहाकार उडाला. गावेच्या गावे कोरोनाने संक्रमित झाली. मात्र अश्या परिस्थितीतही चिंचणी हे गाव अपवाद ठरले आहे. येथे आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला नाही. येथील गावकरी आजही सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून आपला दिनक्रम पार पाडतात.

Exit mobile version