Thu. Dec 2nd, 2021

आता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन !

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

चंद्रभागेच्या तीरावर वसलेले महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरीचा विठुराया. पंढरपूरातील वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा त्रास लवकरच संपणार आहे.

 

भाविकांना आता विठुरायाचे दर्शन अतिशय सुलभरित्या घेता येणार आहे. टोकन पद्धतीने दर्शन घेण्याचा निर्णय समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी घेतला आहे.

 

लाखो भाविक ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता दहा-दहा किलोमीटरपर्यंत रांगेत उभे राहतात. मात्र  आता लवकरच भाविकांचा हा त्रास संपवण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत झाला आहे. कार्तिकी एकादशी पासून प्रायोगिक तत्वावर टोकन पध्दतीने भाविकांना दर्शन मिळणार आहे.

 

यासाठी शासकीय मान्यताप्राप्त कंपनीकडून पंढरपुरात विविध ठिकाणी टोकन केंद्र उभारणी होणार असून भाविक आल्यानंतर थंब इम्प्रेशन द्वारे ही सर्व प्रक्रिया होणार आहे.  यामुळे टोकन पद्धतीमुळे पंढरपुरातील अर्थव्यवस्था सुध्दा सक्षम होण्यास मदत होईल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.

 

पंढरपुरच्या चंद्रभागेचा घाट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी स्वच्छता करण्यासाठी समिती स्वतः सहभाग घेणार आहे. लवकरच स्वच्छ पंढरपूरसाठी निविदा प्रक्रिया राबवणार असून नामांकित कंपनीची निवड या माध्यमातून होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *