Jaimaharashtra news

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे: पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंडातात्या यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

पायी चालणाऱ्या त्यांच्या समर्थक वारकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. म्हणून आळंदीतुन तात्या पहाटे ५ वाजताच बाहेर पडले. तेव्हाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील असं शुक्रवारीच कराडकर यांनी जाहीर केलं. त्यानुसार पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी जायला सुरुवात केली. तेंव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. या वारकऱ्यांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले, त्यावेळी पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलं.

वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आळंदीमध्ये स्थानबद्द केले आहे. ‘पायी चालणे हा गुन्हा असेल तर रोज तसे लाखो गुन्हे दाखल करा.सामान्य नागरिकांचा पायी चालणे हा हक्क कोणतेही सरकार काढू शकत नाही’, अशी भूमिका कराडकर यांनी घेतली आहे. भोसरी येथील भाजप आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्या यांना पाठिंबा दिला आहे.

 

Exit mobile version