Mon. Aug 15th, 2022

‘मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही’

राज्य सरकारने पंढरपूरच्या पायी वारीसाठी साधुसंत आणि वारकऱ्यांवरील अन्याय न थांबवल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. हिंदूंच्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अशी मागणीही प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी केली.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये मुस्लीम आणि ब्रिटिश राजवटीमध्येही खंड पडला नाही. परंतु राज्य सरकारने हिंदूविरोधी भूमिका घेत प्रथमच वारीमध्ये खंड पाडला. याचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘भजन दिंडी’ नेणार असल्याची माहितीही प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिली.

तसेच लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्यांनाच नियम पाळून तपासणी करून प्रवासाची परवानगी द्यावी, संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावात न जाता गावाबाहेर मुक्काम करतील, अशी नियमावली लागू करून वारीला परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री वारकऱ्यांशी संवाद साधायला तयार नाहीत, असा आरोपही विश्व हिंदू परिषदेने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.