Tue. Aug 9th, 2022

मंकीपॉक्स व्हायरसची दहशत

देशासह राज्यात कोरोना विषाणूचा धोका हळू हळू कमी होत असतानाच आता पुन्हा नव्या विषाणूनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील देशांमध्ये वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने संभव्या धोके लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य सरकार पाठोपाठ मुंबई महापालिकेने देखील काही मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत. नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे ही आदेश देण्यात आले आहेत

जगभरात कोरोना प्रादुर्भावा पाठोपाठ आता मंकीपॉक्सनं चिंता वाढवल्याची चित्र दिसून येत आहेत . मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. WHO च्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात जातात .सध्या परिस्थिती पाहणी करता असे समोर आले आहे की भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र इतर देशांतील परिस्थिती पाहता केंद्रीय आरोग्य विभागा कडून सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभाग देखील मंकीपॉक्सबाबत सतर्क होताना दिसत आहे.

कसा वाढतो संसर्गाचा धोका?
हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.

लक्षणे काय आहेत?
ताप येऊन अंगभर पुरळ उठून कालांतराने त्याचे फोडांत रुपांतर होते. अंगदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा हेही लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास गुंतागुंत वाढत जाते.

काय काळजी घ्यावी?
मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.