Fri. Apr 16th, 2021

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे; भाऊ-बहिणीच्या लढाईत कोण बाजी मारणार

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

परळी बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंडे भाऊ-बहीण आमने-सामने आले आहेत.

 

अत्यंत छोट्याशा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात

होती.

 

पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला. परळी नगरपालिका ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडेंना यश मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या

राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या आहेत.

 

परळी बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आता भाऊ-बहिणीच्या लढाईत कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *