Tue. Oct 26th, 2021

पंकजा मुंडे यांच लाक्षणिक उपोषण मागे

पंकजा मुंडे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण मागे घेतलं आहे.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण आणि भाजपच्या झेंड्याखाली हे उपोषण करण्यात आले.  मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं.

या उपोषणाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे उपस्थित होते.

अधिक वाचा : लाक्षणिक उपोषण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी – पंकजा मुंडे 

अफवांवर विश्वास ठेवू नका

यावेळी पंकजा मुंडेंनी अफवावंर विश्वसा ठेवू नका, असे आवाहन केलं. काही दिवसांपासून पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. पंकजा मुंडे यांनी या उपोषणात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानले.

समाजसेवक म्हणून काम करणार

मराठवाड्यासमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्यांवर तोडगा निघणं आवश्यक आहे. वेळोवेळी मराठवाड्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आता समाजसेवक म्हणून काम करणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

सरकारवर टीका करणार नाही

नव्या सरकारकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. मी सरकारवर १०० दिवसांत टीका करणार नाही. असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठवाड्यातील शेतकरी हवालदील आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करतील, असा विश्वाहसही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *