Jaimaharashtra news

लाक्षणिक उपोषण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी – पंकजा मुंडे

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु आहे.

सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण – पंकजा मुंडे

या लाक्षणिक उपोषणा वेळेस पंकजा मुंडेनी उपस्थितांना संबोधित केलं. हे उपोषण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाही. तर सत्ताधाऱ्यांच लक्ष वेधण्यासाठी असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

  

मराठवाड्याच्या अनेक प्रमुख समस्या आहेत. यापैकी स्थलांतरण, बेरोजगारी या प्रमुख समस्या आहेत. या समस्या सोडवायचा असल्यास पाणीप्रश्न सुटायला पाहिजे, असं पंकजा म्हणाल्या.

सत्तेत असताना मराठवाडा टॅंकरमुक्त करण्यासाठी काम केलंय.  या महाविकास आघाडीनेही पाणीप्रश्नाकडे लक्ष द्यायल हवं, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान यासदंर्भात  मुख्यमंत्र्यांची भेट घेणार  असल्याचंही  पंकजा मुंडे म्हणाल्या. 

दुपारी १२. ३० च्या दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

काय म्हणाले फडणवीस ?

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही ज्या योजना घेतल्या, त्या योजना महाविकासआघाडी सरकारने पुढे  न चालवल्यास आम्ही  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरु, अशा थेट इशारा फडणवीस यांनी महाविकासआघाडीला दिला.

मराठवाड्याला  दुष्काळमुक्त करण्याचं गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं. मराठवाड्याच्या हिश्श्याचं  पाणी थांबवल्याचा प्रयत्न  केला तर,  मराठवाडा रस्त्यावर उतरेल असेही फडणवीस म्हणाले. 

क्रेडीट घ्या

तुम्हाला कामाचं क्रेडीट घ्यायचंय तर घ्या. योजनेचं नाव बदला. आणखी काही करायचे असेल तर ते सुद्धा करा. पण मराठवाड्यासाठी असलेली योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन  लढाई लढणार असल्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला. दरम्यान यावेळी उपोषणाच्या ठिकाणी खासदार प्रीतम मुंडे, विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version