Mon. Aug 8th, 2022

पंकजा मुंडे भाजपा सोडणार ?

पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे…

पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आला आहे असं काही राजकीय सुत्रांकडून माहिती झालंय. काही दिवसांपूर्वी भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात  पक्षाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आता पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या भाजपा पासून नाराज आहे. विधान परिषदेवर डावण्यात आल्यानंही त्यांची नाराजी दिसून आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.

काही दिवसापुर्वी पंकजा यांनी शरद पवार यांच टि्वटरवर द्वारे कौतुक केल होत मात्र त्यांनी काही वेळात यांच टि्वट डिलीट केल. म्हणजे भाजपाला दुसरा धक्का बसू शकतो का? अशा अनेक चर्चा राजकीय पक्षात होतांना दिसत आहे.

पुण्यात एका पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांना पंकजा मुंडेंबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटलं ‘मला पंकजा मुंडेंविषयी फार माहिती नाही. शिवसेनेकडून कोणी अशी ऑफर दिली नाही. त्यांना अशाप्रकारची ऑफर फक्त उद्धव ठाकरेचं देऊ शकतात’, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.