Jaimaharashtra news

कॉंम्रेड पानसरेंच्या हत्येला 2 वर्ष, मॉर्निंग वॉकला विश्वास नांगरे पाटलांची हजेरी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कॉंम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास योग्य रितीने सुरु असल्याचा विश्वास विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.

 

कॉंम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण झालेली असतानाही अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आलेलं नाही. त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याच्या मागणीसाठी गेल्या 2 वर्षांपासून मॉर्निंग वॉक सुरु करण्यात आला.

 

आज या मॉर्निंग वॉकला विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावू सर्वांनाच आश्चर्य़ाचा धक्का दिला. शिवाय तपास योग्य पद्धतीने सुरु असून महत्वाच्या टप्प्यावर आल्याचंही स्पष्ट केलं. यावेळी नांगरे पाटील यांनी मै खाकी हु या कवितेच्या माध्यमातून पोलिसांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं.

Exit mobile version