Jaimaharashtra news

पनवेलमध्ये वृद्धाश्रमातील ५६ वृद्ध कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच कोरोनाचा धोका असल्याचं दिसत आहे. वृद्धाश्रमातील वृद्धदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे.

पनवेलमधील एका वृद्धाश्रमातील ५६ वृद्ध कोरोनाबाधित आहेत.या वृद्धाश्रमातील २ वृद्धांचा मृत्यू झाला आहे. तळोजामधील आबानंद वृद्धाश्रमात या वृद्धांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. ६१ निराधार वृद्धांपैकी ५६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

या कोरोनाबाधित वृद्धांपैकी १४ गंभीर वृद्धांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version