Fri. May 20th, 2022

World Cupमुळे पॅरा स्वीमरच्या 5 सुवर्णांकडे दुर्लक्ष ?

एकीकडे World Cup 2019 सुरू असून दुसरीकडे नाॅरवेजिअन स्विमिंग चॅम्पियन 2019 सुद्धा सुरू आहे. मात्र World Cup मुळे इतर खेळाडू आणि खेळांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भारताची मान अभिमानाने उंचवणारा नम्मा बंगळूरूचा 24 वर्षीय पॅरा स्वीमर निरंजन मुकादमने स्विमिंग चॅम्पियन 2019मध्ये 5 सुवर्णपदक जिंकले आहेत. निरंजनने शारिरीक व्यंगावर मात करत घवघवीत यश मिळवले आहे.

भारताच्या निरंजनची 5 सुवर्णांची कमाई

World Cup 2019  स्पर्धेबरोबर दुसरीकडे नाॅरवेजिअन स्विमिंग चॅम्पियन 2019 स्पर्धा सुरू झाली आहे.

या स्पर्धेत नम्मा बंगळूरूच्या निरंजन मुकादमने पॅरा स्विमिंगमध्ये 5 सुवर्ण पदक पटकावले आहे.

निरंजन मुकादमने त्याच्या व्यंगावर मात करत यशाला गवसणी घातली आहे.

जन्मापासून स्पिन बिफिल्डाने ग्रस्त असणाऱ्या निरंजनचे पायही एकामेकांना जोडलेल्या स्थितीत होते.

बेंगलोर मिररच्या वृत्तानुसार निरंजनच्या पायावर आतापर्यंत 17 शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत.

या शस्त्रक्रीयात निरंजनच्या पायामध्ये 32 मेटल राॅड आहे.

इतक्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निरंजन पॅरा स्विमर बनला आहे.

नाॅरवेजिअन स्विमिंग चॅम्पियन 2019 स्पर्धतील 200 m IM ( individual medley ) , 200 m breaststroke, 100 m freestyle, 50 m butterfly आणि 50 m breaststroke अशा पाच स्पर्धांमध्ये निरंजनने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

देशात खेळाडूंसाठी पुरेपुर सुविधा नसल्या तरीही देशातील खेळाडू आपल्या कामगिरीने देशाची मान अभिमानाने उंचावत आहेत.

आता सध्या सगळ्यांचे लक्ष World Cup 2019कडे असून अशावेळी निरंजनने कमावलेल्या सुवर्ण पदकांकडे दुर्लक्ष होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.