Jaimaharashtra news

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे परम बीर सिंह यांच्या रुपाने मुंबईला नवे आयुक्त मिळाले आहेत.

परम बीर सिंह 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

परम बीर सिंह यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज अधिकारी होते. याशर्यतीत परमबीर सिंह यांनी सर्वांना मागे टाकलंय.

मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंह यापूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

तसेच परमबीर सिंह हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.

परम बीर सिंह हे अतिशय अनुभवी अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच अनेक पदांचाही त्यांना अनुभव आहे.

याआधी आज शनिवारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे सेवानिवृत्त झाले.

संजय बर्वे यांचा आयुक्त पदाचा १ वर्षांचा कालावधी होता. परंतु २०१९ या वर्षाता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या.

यामुळे संजय बर्वे यांना आयुक्त पदाची २ वेळा मुदत वाढवून दिली होती.

Exit mobile version