Wed. Aug 4th, 2021

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मनसुख हिरेन मर्डर केसमध्ये दिवसेंदिवस गुंतागुत वाढली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. शिवाय उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला असून गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेत केली होती. मात्र आता परमबीर सिंह यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायायलात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख त्यांनी याचिकेत केला होता. सुप्रीम कोर्टाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली. तसंच यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली. परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. शिवाय सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीरप्रकारचे असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत अशी विचारणा केल्यानंतर मुकूल रोहतगी यांनी आजच उच्च न्यायालयात अर्ज करु अशी माहिती दिली.

याचिकेत आहे तरी काय?

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ठाकरे सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यानी टीका केली आहे. विरोधकांकडून वाझे प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. गृह विभागाने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्त पदाची सूत्रं देण्यात आली. शिवाय अचानक करण्यात आलेल्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचं सांगितल्यानं अनिल देशमुख यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

याचिकेत आहे तरी काय?

अनिल देशमुख यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी याचिकेत केला आहे. सिंह यांनी याचिकेत तीन मागण्या केल्या आहे. अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर आहे त्यामुळे, बदली रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, असं सिंह यांनी याचिकेत मांडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *