Wed. Dec 1st, 2021

आता काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या जवानांना विमान प्रवासाची सुविधा  

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात निमलष्करी दलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

त्यानुसार यापुढे निमलष्करी दलाच्या जवानांना दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, श्रीनगर-जम्मू व जम्मू-श्रीनगर दरम्यान विमानाने प्रवास करता येणार आहे.

सुमारे 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे.

कर्तव्यावर असताना तसेच सुट्टीवर जाताना वा पुन्हा रुजू होताना श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी ही सुविधा मिळेल.

यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *