Thu. Sep 29th, 2022

परशुराम घाट एक तासासाठी सुरु

मुंबई गोवा महामार्गावर ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे अनेक दिवसांपासून महामार्गावर रखडलेल्या अवजड वाहनांमुळे चालकांचा उद्रेक झाला आहे. खाण्यापिण्याच्या व्यवस्था नाहीत, व्यावसायिक नुकसान होत असल्यामुळे ट्रक चालक संतापले आहेत. पर्यायी मार्गाने देखील अवजड वाहने सोडत नसल्यामुळे चालकांचे नुकसान होत आहे, यातच संतापलेल्या ट्रकचालकांनी चिरणी आंबडस रस्ता ट्रक आडवा लावून ब्लॉक केला आहे.या आंदोलनामुळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे, ट्र्क चालकांनी आज सकाळी चक्का जाम आंदोलन केल्याने प्रशासनाने परशुराम घाट एक तासासाठी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कुमक मागवण्यात आली आहे. हा घाट एक तासासाठी चालू करण्यात आला आहे.

का झाला होता परशुराम घाट बंद

मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील दरड खाली कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली असून हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या आधी ०२ जुलै २०२२ रोजी परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद झाला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड बाजूला करुन पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली होती. त्यानंतर दरड खाली येण्याचे प्रमाण वाढतचं राहिले

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.