वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सार्वजनिक स्मशानभूमीचं शुद्धीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे.
अंनीसच्या शहर शाखा कार्याध्यक्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्यात आला असून यावेळी मांसाहार करण्यात आले, मात्र स्मशानभूमीत मांसाहार करणं चुकीचं असल्याचा दावा करत अंनिसच्या वाढदिवस कार्यक्रमामुळे स्मशानभूमी अपवित्र झाल्याचं पुरोहितांनी म्हटलं आहे.
या कार्यक्रमानंतर मांसाहार करून जाणीवपूर्वक विटंबना केल्याचा दावा करत पुरोहित आणि महाराजांच्या उपस्थितीत सार्वजनिक स्मशानभूमीचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे.
गोमूत्र शिंपडून वेद मंत्रौच्चाराचं वाचन करत या स्मशानभूमीचं शुद्धीकरण करण्यात आलं.
या सर्व प्रकारानंतर अंनिस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील पुरोहितांकडून करण्यात आली आहे.